पारोळ्यानजीक ओमनीत गॅस भरताना स्फोट : दोन्ही वाहने खाक


Explosion while filling omni gas near Paroli: Both vehicles destroyed पारोळा : पारोळा तालुक्यातील म्हसवे शिवारातील राजस्थानी हॉटेलनजीक ओमनीमध्ये गॅस भरताना सिलिंडरचा स्फोट झाला. ही घटना शनिवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही. दरम्यान, या घटनेनंतर जिल्ह्यातील अवैध गॅस रिफिलिंगचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

गॅस भरताना मोठा स्फोट
समजलेल्या माहितीनुसार, म्हसवे शिवारातील राजस्थानी हॉटेलच्या मागे रात्री 9.30 वाजेच्या सुमारास ओमनी गाडीमध्ये गॅस भरताना गॅस टाकीने अचानक पेट घेतला त्यामुळे घटनास्थळी असलेल्या दोन गाड्यांमध्ये गॅस भरताना मोठा स्फोट झाला.



अधिकार्‍यांची घटनास्थळी धाव
घटनेची माहिती मिळताच तहसीलदार उल्हास देवरे, पोलिस उपनिरीक्षक तसेच पोलिसांसह शहर तलाठी निशिकांत माने आदी घटनास्थळी दाखल झाले. अपघाताची माहिती मिळताच दोन रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी दाखल झाल्या. कोणत्याही दुखापतीची नोंद नाही तर आग रात्रीच विझवण्यात आली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आयुष प्रसाद आणि जिल्हा पोलिस अधीक्षक एम.राजकुमार आपत्कालीन प्रतिसादाचे निर्देश दिले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !