श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा दिनानिमित्त 22 रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी


मुंबई : अयोध्येतील श्रीराम मंदिरात सोमवार, 22 जानेवारी 2024 रोजी प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होत असून यानिमित्त राज्य शासनाने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. याबाबतची अधिसूचना सामान्य प्रशासन विभागाने काढली आहे.

अयोध्येत 22 जानेवारी 2024 अयोध्येत श्रीराम जन्मभूमी येथे उभारण्यात आलेल्या भव्य मंदिरात श्रीराममललांची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारद्वारे 22 जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.



22 जानेवारी रोजी सरकारी, खाजगी कार्यालय, शाळा आणि महाविद्यालये बंद राहणार आहेत. केंद्रीय कर्मचार्‍यांना हाफ डे देण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर राज्य सरकारकडून सुट्टी जाहीर करण्यात आली.

 








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !