पोलिस कर्मचार्यांसह अधिकार्यांच्या रजा 28 जानेवारीपर्यंत रद्
Leave of officers including police personnel canceled till January 28 नागपूर : पोलीस महासंचालनालयाने राज्यातील पोलि अधिकारी आणि कर्मचार्यांच्या वैद्यकीय रजा वगळता कुठल्याही सुट्या मिळणार नसल्याचे जाहीर केले आहे. 28 जानेवारीपर्यंत रजा रद्द करण्यात आल्या आहेत. सोमवार, 22 जानेवारीला अयोध्येतील श्रीराम मंदिरात रामललाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होत आहे त्यामुळे रामभक्तांकडून राज्यभरात ठिकठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कायदा-सुव्यवस्था राखण्याचे आव्हान
जरांगे पाटील आणि मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे आहे. कुठल्याच ठिकाणी कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून ठिकठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवावा लागणार आहे. त्यासाठी जागोजागच्या पोलिस अधिकार्यांना पोलिस कर्मचार्यांचे मोठे मनुष्यबळ हाताशी ठेवावे लागणार आहे. ते लक्षात घेता पोलिस महासंचालनालयाने गृह खात्याच्या निर्णयाचा हवाला देत शुक्रवारी एक आदेश जारी केला. विशेष पोलिस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) सुहास वारके यांच्या स्वाक्षरीने निघालेल्या या आदेशपत्रात राज्यातील सर्व पोलिस अधिकारी आणि कर्मचार्यांच्या साप्ताहिक सुट्यांसह सर्व प्रकारच्या (वैद्यकीय वगळता) सुट्या बंद करण्याचे आदेश दिले आहे.


हे आदेश देतानाच राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्वोतोपरी दक्षता घेण्याचेही सांगण्यात आले आहे. सर्व पोलीस आयुक्तालये,गुप्तवार्ता विभाग, राज्य राखीव पोलीस दल, नक्षल विरोधी अभियान, विशेष कृती दलासह जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातून शनिवारी सकाळी संबंधित पोलिसांना या आदेशाची माहिती देण्यात आली आहे. 20 ते 28 जानेवारीपर्यंत कुणालाच सुटी घेता येणार नसल्याचेही कळविण्यात आले आहे.





