शिरसाळा मारोतीच्या दर्शनावरून परतणार्‍या जळगावातील तरुणाचा मृत्यू : दोघे गंभीर


Death of young man from Jalgaon returning from Shirsala Maroti’s darshan: Two serious जळगाव : बोदवड तालुक्यातील शिरसाळा मारोतीच्या दर्शनाहून परतणार्‍या तरुणाचा दुचाकी घसरुन झालेल्या अपघातात मृत्यू झाला. नेहाल राजेश माचरे (18, रा.कंजरवाडा, जळगाव) असे मयताचे नाव असून या अपघातात अक्षय राजेश माचरे (23) व त्याचे नंदुरबार येथून आलेली आतेबहीण उन्नती रविचंद्र रमाईचेकर (12) हे दोघे गंभीर जखमी झाले. हा अपघात सोमवार, 22 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता जळगाव तालुक्यातील मन्यारखेडा फाट्याजवळ घडला.

दर्शन घेवून परतताना अपघात
जळगाव शहरातील कंजरवाडा परिसरात नेहाल राजेश माचरे हा तरुण आई, वडील, तीन भाऊ, एक बहिणीसह वास्तव्यास आहे. त्याचे वडील हातमजूरी करुन कुटुंबाचा उदनिर्वाह करतात तर नेहाल हा शिक्षण घेत असतांना एका फोटो स्टुडीओमध्ये काम करुन कुटुंबाला हातभार लावत होता. नेहाल हा त्याचा मोठा भाऊ अक्षय राजेश माछरे आणि त्याचे नंदुरबार येथून आलेली आतेबहिण उन्नती रविचंद्र रमाईचेकर यांच्यासोबत सोमवार, 22 जानेवारी रोजी सुट्टी असल्यामुळे बोदवड तालुक्यातील शिरसाळा मारुती मंदिर येथे दर्शनासाठी गेले होते.



दुचाकी घसरुन अपघात
सकाळी दर्शन आटोपून परतत असताना 10 वाजेच्या सुमारास मन्यारखेडा फाट्याजवळ त्यांची दुचाकी घसरुन अपघात झाला. समोरील वाहनाने अचानक आपले वाहन हळू केल्यामुळे दुचाकीस्वार असलेल्या अक्षयने आपली दुचाकीचा ब्रेक दाबला त्यामुळे त्यांची दुचाकी घसरुन अपघात झाला. या अपघातात नेहाल माचरे याच्यावर काळाने झडप घालून त्याला हिरावून घेतले तर त्याचा भाऊ आणि बहिण हे दोघे गंभीर जखमी झाले.

अपघातात दोघे गंभीर
अपघात झाल्याचे कळताच परिसरातील नागरीकांनी व पोलिसांनी धाव घेत जखमींना तात्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्या ठिकाणी नेहाल माछरे यास वैद्यकीय अधिकारी डॉ.आदित्य साळुंखे यांनी मयत घोषित केले. जखमी अक्षय माछरे व उन्नती तमायचेकर यांच्यावर उपचार सुरू आहेत. मयत नेहालच्या कुटुंबीयांना माहिती मिळताच त्यांनी शासकीय रुग्णालयात धाव घेत आक्रोश केला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !