शेतकर्यांना घामाचे मोल मिळण्यासाठीच तीनही पक्ष एकत्र
माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार : चोपड्यात सुतगिरणीच्या प्रकल्पाचे उद्घाटन
चोपडा : शेतकर्यांच्या शेत मालाला रास्ता भाव मिळावा व त्याच्या घामाचे मोल त्याला मिळण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस तसेच शिवसेना पक्ष एकत्र आले व सरकार स्थापन करण्यात आले, अशी माहिती माजी केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे दिली. चोपडा सुतगिरणीच्या प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. पवार म्हणाले की, आज देशाची आर्थिक स्थिती बिकट असून सर्वत्र मंदी आहे. देशात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढले असून शेती मालाला भाव मिळत नसल्याची स्थिती आहे. प्रसंगी त्यांनी मोदींच्या दुटप्पी भूमिकेवरही टिका केली.
