हे राम ! अयोध्येतील राम मंदिरात देणगीची चोरी ; टिन्नू यादवसह आठ आरोपींना अटक


Theft of donation at the Ram Mandir in Ayodhya; eight accused, including Tinnu Yadav, arrested.अयोध्या (26 जून 2026) : देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अयोध्येतील राम मंदिर देणगी चोरी प्रकरणात मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांचे निकटवर्तीय रमाशंकर यादव उर्फ टिन्नू यांच्यासह आठ आरोपींना गुरुवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे. एफआयआरमध्ये चंपत राय, डॉ.अनिल मिश्रा यांच्यासह इतर मोठ्या पदाधिकार्‍यांची नावे समाविष्ट नसल्यची माहिती आहे.

यांच्याविरोधात दाखल झाला गुन्हा
गुरुवारी संध्याकाळी देणगी चोरी प्रकरणात पहिली एफआयआर नोंदवण्यात आली. श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य कृष्ण मोहन यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. यात टिन्नू, लवकुश मिश्रा, अनुकल्प मिश्रा, मनीष यादव, अविनाश शुक्ला, करुणेश पांडे, सुभाष चंद्र श्रीवास्तव आणि रमाशंकर मिश्रा यांचा उल्लेख करण्यात आला आहे. यापैकी बहुतेक जण देणगी मोजणी आणि दान व्यवस्थापनाशी संबंधित होते.



तथापि, एफआयआरमध्ये चंपत राय, डॉ. अनिल मिश्रा यांच्यासह इतर मोठ्या पदाधिकार्‍यांची नावे समाविष्ट नाहीत. चोरीचे प्रकरण प्रथम 7 जून रोजी समोर आले होते. यूपी सरकारने 13 जून रोजी ट्रस्टच्या विनंतीवरून एसआयटी स्थापन केली होती. एसआयटीने 23 जून रोजी यूपीचे अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) संजय प्रसाद यांना प्राथमिक अहवाल सादर केला. संजय प्रसाद हे ट्रस्टचे पदसिद्ध सदस्य देखील आहेत.

हा दिवसाढवळा दरोडा
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी रामललाचे दर्शन घेतले. गुरुवारी सायंकाळी अयोध्येला पोहोचल्यानंतर त्यांनी म्हटले होते की, या लोकांनी देवाच्या पवित्र घरात केवळ चोरीच केली नाही तर दिवसाढवळ्या दरोडा टाकला आहे. यामुळे माझे मन खूप दुःखी आहे.

राम मंदिरातील चोरीचा प्रकार कसा उघडकीस आला?
मंदिरातील कर्मचार्‍यांना अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या अपहाराची कल्पना होती. प्रभावशाली व्यक्तींचा यात सहभाग असल्याने ते गप्प राहिले मात्र गेल्या दोन वर्षांत ‘तिन्नू’चा प्रभाव वाढल्यामुळे मंदिरातील कर्मचार्‍यांच्या एका गटात त्याबद्दल नाराजी निर्माण झाली. या गटाने त्याच्याजवळ जाण्याची योजना आखली, सर्व तथ्ये गोळा केली आणि ती माहिती प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचवली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !