कोळन्हावी गावातील तरुणाचा खून : चौथ्या संशयीला अटक

अपघात करून दर्शवली तरुणाची हत्या : अटकेतील चौघांना पुन्हा एक दिवसाची पोलीस कोठडी


Murder of a youth from Kolnhavi village: Fourth suspect arrested यावल (25 जून 2026) : यावल तालुक्यातील कोळन्हावी ते डांभूर्णी रस्त्यादरम्यान बुधवार, 17 जुन रोजी मध्यरात्रीनंतर अज्ञात वाहनाच्या धडकेत 26 वर्षीय तरुण ठार झाल्याचा बनाव तिघांनी केला होता. मात्र पोलिसांनी तपासाअंती खुन झाल्याचे निष्पन्न केले होते व या गुन्ह्यात प्रारंभी तीन संशयीतांना अटक करण्यात आली. या गुन्ह्याचा तपासात मयत तरुणास दुचाकीव्दारे पार्टीत कुंदन सोळुंके याने आणल्याचे समोर आल्याने त्याला देखील अटक करण्यात आली. चौघांना गुरुवार यावल न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना पुन्हा शुक्रवारपर्यंत एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

काय आहे प्रकरण ?
कोळन्हावी, ता.यावल येथील रहिवाशी पवन रवींद्र सोळंके (26) या तरुणाची हत्या करीत अपघाताचा बनाव करण्यात आला होता तर पोलीस तपासात उमेश दिलीप परदेशी (32, रा.कोळन्हावी), चेतन मोतीराम कोळी (32, रा.डांभूर्णी) व लोकेश दिवाकर महाजन (32, रा.डांभूर्णी) या तिघांनी मयतासह बुधवार, 17 रोजी रात्री पार्टीचे नियोजन केले होते. पार्टी झाल्यानंतर दारूच्या नशेत झालेल्या वादात त्याची हत्या केल्याचे उघड झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली होती व न्यायलयाने तिघांना 25 जुनपर्यंत सहा दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.



चौघा संशयीतांना एका दिवसांची पोलीस कोठडी
संशयीत तिघांकडे पोलीस कोठडीत तपास करतांना कोळन्हावी येथील रहिवासी कुंदन कैलास सोळुंके याने मयत पवन यास कोळन्हावी येथून त्यांच्या दुचाकीवर पार्टी ठिकाणी आणून सोडले होते व तो निघुन गेला होता. कटात तो सहभागी असल्याचा देखील उलगडा झाल्याने त्यालादेखील पोलिसांनी अटक केली. संशयीत चौघांना गुरुवारी न्यायालयात प्रथमवर्ग न्या.आर.एस.जगताप यांच्या समोर हजर केले असता या चौघांना पुन्हा एक दिवसाची शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अजयकुमार वाढवे, हवालदार वासुदेव मराठे करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !