दुचाकीवरून पडल्याने असोद्यातील विवाहितेचा मृत्यू


A married woman in Asoda died after falling from a bike जळगाव : जळगाव तालुक्यातील असोदा येथील विवाहितेचा दुचाकीवरून तोल जावून पडल्याने मृत्यू झाला. हा अपघात धरणगाव तालुक्यातील एकलग्न गावाजवळील मुसळी फाट्यावर मंगळवार, 23 जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजता घडला. स्पीडब्रेकरमुळे दुचाकीचा तोल गेला व विवाहिता दुचाकीवरून पडल्याने डोक्याला जबर मार बसला. उपचार सुरू असतांना विवाहितेचा बुधवारी मृत्यू झाला. धनश्री गोपीचंद पाटील (28, रा.असोदा, ता.जळगाव) असे विवाहितेचे नाव आहे.

दुचाकीवरून तोल जावून पडल्याने मृत्यू
धनश्री पाटील ही विवाहिता पती गोपीचंद, दोन मुले, सासू-सासरे यांच्यासह जळगाव तालुक्यातील आसोदा येथे वास्तव्यास होती. पती गोपीचंद हे फर्निचर काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. काही कामानिमित्त गोपीचंद पाटील हे आपल्या पत्नीसोबत मंगळवार,23 जानेवारी रोजी रोजी सकाळी धुळे येथे गेले होते. तेथून परतत असताना सायंकाळी सात वाजता धरणगाव तालुक्यातील एकलग्न गावाजवळील मुसळी फाट्याजवळून जात असतांना रस्त्यात अचानक स्पीडब्रेकर आल्याने ब्रेक लावल्यावर वाहनावरून दोघे खाली पडले.



धनश्री पाटील ह्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्या जबर जखमी झाल्या. त्यांना जळगावात खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना बुधवार, 24 जानेवारी रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. यावेळी कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. त्यांची दोन मुले मातृप्रेमाला पोरकी झाली आहे. जिल्हापेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !