भाषा संवर्धन ही काळाची गरज : प्राचार्य डॉ.एस.व्ही.पाटील
भुसावळातील पु.ओं.नाहाटा महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा
Language conservation is the need of the hour : Principal Dr.S.V.Patil भुसावळ : भाषा संवर्धन ही काळाची गरज आहे. कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ज्ञान मिळते म्हणून विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रमात जास्तीत जास्त सहभाग घ्यावा, असे आवाहन प्राचार्य डॉ.एस.व्ही.पाटील यांनी येथे व्यक्त केले. कला, विज्ञान व पु.ओं.नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात मराठी विभाग आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त 23 व 24 जानेवारी रोजी मराठी अंताक्षरी, मराठी उखाणे, प्रश्नमंजूषा, सुंदर हस्ताक्षर, पुस्तक परीक्षण, समीक्षण, रसग्रहण अशा विविध स्पर्धा व कार्यक्रम आयोजित करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी प्राचार्य बोलत होते.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ.बी.एच.बर्हाटे, उपप्राचार्य डॉ.ए.डी.गोस्वामी, प्रा.डॉ.जे.एफ.पाटील, प्रा.डॉ.के.के.अहिरे होते. प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ.जे.एफ.पाटील यांनी केले. 23 रोजी प्रथम सत्रात मराठी गाण्यांवर आधारीत अंताक्षरी व मराठी उखाणे स्पर्धा घेण्यात आली विद्यार्थ्यांचे पाच गट करण्यात आले व मराठी गाण्यांच्या विविध फेर्या घेण्यात आल्या. प्रथम क्रमांक मोगरा, व्दितीय क्रमांक जास्वंद, तृतीय क्रमांक गुलाब या तीन विजेत्या गटांना बक्षीस देण्यात आले. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून डॉ.निनु झोपे, प्रा.संगीता भिरुड, प्रा.नेहा महाजन यांनी काम पाहिले. द्वितीय सत्रात दुसरी स्पर्धा मराठी भाषेतील उखाण्यांची घेण्यात आली . विद्यार्थ्यांनी सण-उत्सवातील गंमतीशीर उखाणे सादर केले. या स्पर्धेमधून महाराष्ट्रातील उखाण्यांची परंपरा त्यांना कळली. यात अनुक्रमे प्रथम दिव्या पाटील, द्वितीय कल्पेश ठोसर, तृतीय रीना बाविस्कर या विद्यार्थ्यांना पारीतोषिके देण्यात आले. परीक्षक म्हणून प्रा.अक्षरा साबळे, प्रा.नेहा महाजन यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन प्रा.डॉ.पुरुषोत्तम महाजन तर आभार प्रा.गौतम भालेराव यांनी मानले.


प्रश्नमंजूषा स्पर्धा
विद्यार्थ्यांचे सामान्य ज्ञान तपासण्यासाठी साहित्य, संस्कृती, कला यावर आधारीत 24 रोजी प्रश्नमंजूषा स्पर्धा घेण्यात आली. त्यासाठी पाच गट करण्यात आले. तीन गटांना प्रथम जास्वंद, व्दितीय पुर्णा, तृतीय वाघूर या विजेत्या गटांना बक्षीसे देण्यात आली. यानंतर सुंदर हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आली. एकूण पंचवीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामधून देखील तीन बक्षीसे देण्यात आली. परीक्ष प्रा.डॉ.स्वाती महाजन, प्रा.वंदना महाजन यांनी काम सांभळले. सूत्रसंचालन प्रा.डॉ.पुरुषोत्तम महाजन यांनी केले. गुरुवार, 25 रोजी पुस्तक परीक्षण, समीक्षण, रसग्रहण स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांना वाचन, समीक्षण, रसग्रहणाची आवड निर्माण व्हावी यासाठी स्पधेचे आयोजन करण्यात आले. यात सत्तावीस विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यातील प्रथम तीन विद्यार्थ्यांना बक्षीसे देण्यात आली.
यांची स्पर्धांसाठी उपस्थिती
स्पर्धेसाठी महाविद्यालयातील प्रा.डॉ.दिनानाथ पाठक, प्रा.डॉ.एस.टी.धूम, प्रा.डी.एन.पाटील, प्रा.डॉ.आर.एस.नाडेकर, प्रा.डी.एम.टेकाडे, प्रा.डॉ.पी.ए.अहिरे, प्रा.एस.के.राठोड, प्रा.डॉ.स्मिता चौधरी, प्रा.डॉ.जितेंद्र आडोकार, प्रा.अदनान शेख, प्रा.डॉ.सचिन राजपूत, प्रा.शीतल सोनवणे, प्रा.शिवानी माळी, प्रा.कविता पांडव, प्रा.शलाका निकम उपस्थित होत्या. महाविद्यालयातील बहुसंख्य प्राध्यापक आणि विद्यार्थी कार्यक्रमास उपस्थित होते.