जळगावच्या फॉरेस्ट कॉलनीत घरफोडी
Burglary in Jalgaon’s Forest Colony जळगाव : जळगाव शहरातील रींग रोडवरील फॉरेस्ट कॉलनीतील एका घरातून अज्ञात चोरट्याने 10 हजारांची रोकड आणि बँकेतील लॉकरची चावी लांबवली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
बंद घराला केले टार्गेट
रुपाली मुकेश पुर्णपात्रे वय 41 रा. फॉरेस्ट कॉलनी, रिंगरोड, जळगाव या महिला आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. 21 जानेवारी रोजी रात्री 8 ते 22 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजेच्या दरम्यान त्यांच्या घरातून अज्ञात व्यक्तीने 10 हजारांची रोकड आणि बँकेतील लॉकरची चावी चोरून नेल्याचे समोर आले.


हा प्रकार लक्षात आल्यानंतर रूपाली पूर्णपात्रे यांनी बुधवार,, 24 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता त्यांनी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल केला. तपास पोलिस नाईक कमलेश पवार करीत आहेत.
