वराडसीम गावातील 21 वर्षीय तरुणाचा विष प्राशनानंतर मृत्यू
A 21-year-old youth from Varadsim village died after consuming poison भुसावळ : भुसावळ तालुक्यातील वराडसीम 21 वर्षीय तरुणाने विषारी औषध घेतल्यो त्याच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू होते मात्र उपचारादरम्यान गुरुवार, 25 जानेवारी रोजी पहाटे दोन वाजता तरुणाचा मृत्यू झाला. हर्षल ज्ञानेश्वर चौधरी (21, रा.वराडसीम) असे मयताचे नाव आहे. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
विषारी औषध केले सेवन
हर्षल चौधरी हा आपल्या परिवारासह भुसावळ तालुक्यातील वराडसीम येथे वास्तव्याला होता. 23 जानेवारी रोजी त्याने घरी असताना काहीतरी विषारी औषध सेवन केल्यानंतर त्याला तातडीने नातेवाईकांनी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले. उपचार सुरू असताना गुरुवार, 25 जानेवारी रोजी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. यावेळी नातेवाईकांनी मोठी गर्दी केली. तपास पोलिस नाईक कैलास बाविस्कर करीत आहे.


