चोपड्यानजीक 52 लाखांचा गुटखा आयजींच्या पथकाने पकडला


Gutkha worth 52 lakhs was caught by the IG team near Chopda चोपडा : आयजींच्या विशेष पथकाने गुटख्याची तस्करी रोखत तब्बल आयभर भर गुटखा जप्त केला असून त्याचे बाजारमूल्य तब्बल 52 लाख असल्याचे सूत्रांनी सांगितले. नाशिकच्या विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्या पथकाने सोमवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास ही कारवाई केली. 52 लाख 31 हजार 105 रुपये किंमतीच्या गुटख्यासह दहा लाखांचा ट्रक जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी आठ आरोपींविरोधात चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

तालुक्यातील सर्वात मोठी कारवाई
मध्यप्रदेशातून जळगावकडे गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती आयजी पथकाला मिळाल्यानंतर गोपनीय पद्धत्तीने सापळा रचण्यात आला. आयशर (एम.एच.19 सी.वाय. 6972) हा चोपडा-शिरपूर रस्त्यावरील चावरा इंग्लिश मेडियम स्कूलजवळ आल्यानंतर त्याची झडती घेण्यात आली असता त्यात गुटखा आढळल्याने बंदोबस्तात वाहन चोपडा शहर पोलिसात आणण्यात आले. या आयशर ट्रकमध्ये विमल पान मसाला, सागर पानमसाला, राजनिवास व तंबाखू असा गुटखा आढळला. आतापर्यंत गुटख्यावरील ही सर्वात मोठी कारवाई असल्याची माहिती अन्न सुरक्षा नधिकारी शरद पवार यांनी दिली. गुटख्यातील संशयित आरोपी हे जळगाव शहर, भडगाव व पारोळा तालुक्यातील आहेत. आयजींच्या पथकातील पोलिस निरीक्षक दौलत जाधव व सहकार्‍यांनी ही कारवाई केली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !