जळगावात ड्यूटीवरून वाद : बस चालकाच्या डोक्यात मारला दगड


Argument over duty in Jalgaon : Stone hit bus driver on head जळगाव : शहरातील नवीन बसस्थानकात असलेल्या पेट्रोल पंपाच्या समोर ड्युटी लावण्याच्या कारणावरून बसचालकाच्या डोक्यात दगड मारण्यात आला. हा प्रकार सोमवार, 29 जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता घडला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात एकाविरोधात रात्री 10 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे मारहाण प्रकरण
योगेश धर्मराज माळी (43, रा. कौशल्य नगर, पाळधी, ता.धरणगाव) हे जळगाव शहरातील नवीन बसस्थानकात बस चालक म्हणून नोकरीला आहे. सोमवार, 29 जानेवारी रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास नवीन बसस्थानक डेपो मधील पेट्रोल पंपाजवळ ड्युटी राहण्याच्या कारणावरून शिवम संजय सूर्यवंशी (जळगाव) याने बसचालक योगेश धर्मराज माळी यांना हातातील दगडाने मारहाण केली त्यामुळे चालक योगेश माळी यांच्या डोक्याला हाताला गंभीर दुखापत झाली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर रात्री 10 वाजता चालक योगेश माळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शुभम संजय सूर्यवंशी यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल सलीम तडवी हे करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !