महेश्वर रेड्डी जळगावचे नूतन पोलिस अधीक्षक : जळगावचे पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांची सोलापूर आयुक्तपदी बदली

जळगावचे पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांची सोलापूर आयुक्तपदी बदली


Maheshwar Reddy is the new Superintendent of Police of Jalgaon जळगाव : जळगावचे पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांची सोलापूर शहर पोलिस आयुक्तीपदी पदोन्नतीवर बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी एमसीव्ही महेश्वर रेड्डी बृहन्मुंबई पोलिस उपायुक्त एमसीव्ही महेश्वर रेड्डी बदलून येत आहेत. शासनाचे सहसचिव व्यंकटेश भट यांनी बुधवारी सायंकाळी भारतीय व राज्य पोलिस सेवेतील अनेक अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. ज्यात जळगावचे पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांचीही बदली झाली आहे.

मोक्कासह हद्दपारीच्या सर्वाधिक कारवाया
20 ऑक्टोबर 2022 रोजी जळगाव पोलिस दलात एम.राजकुमार यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या कार्यकाळात सर्वाधिक मोक्कासह हद्दपारीच्या कारवाया करण्यात आल्या. अत्यंत शिस्तबद्ध अधिकारी म्हणून एम.राजकुमार यांनी काम पाहिले. पोलिस दलातील कसूर करणार्‍या अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांवरही त्यांनी कुठल्याही दबावाविना कठोर कारवाई करीत आपल्या कार्याचा ठसा उमटवला. अत्यंत शिस्तबद्ध अधिकार्‍यांच्या बदलीनंतर पोलिस कर्मचार्‍यांना मोठा धक्का बसला आहे.







नाशिक परीक्षेत्राच्या महानिरीक्षक दत्तात्रय कराळे
नाशिक परीक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर यांच्या जागी जळगावचे तत्कालीन पोलिस अधीक्षक व ठाणे शहर सह पोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे यांची बदली करण्यात आली आहे.

चाळीसगाव अपर अधीक्षकपदी कविता नेरकर
चाळीसगावचे अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे यांची पुणे ग्रामीण अपर पोलिस अधीक्षकपदी बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी महाराष्ट्र राज्य मुंबई सायबर सेलच्या कविता नेरकर बदलून येत आहेत.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !