भुसावळातील के.नारखेडे विद्यालयात इयत्ता दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप
Farewell to the students of class X-XII at K. Narkhede Vidyalaya in Bhusawla
भुसावळ : शहरातील के. नारखेडे विद्यालयात इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना नुकताच निरोप देण्यात आला. व्यासपीठावर श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी पी.व्ही.पाटील अध्यक्षस्थानी होते. प्रमुख अतिथी म्हणून साकेगावच्या इंदिरा गांधी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक व जळगाव जिल्हा मुख्याध्यापक संघाचे माजी सचिव जी.आर.चौधरी उपस्थित होते.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
विद्यालयाचे मुख्याध्यापक एन.बी.किरंगे, संस्थेचे ऑनररी जॉईंट सेक्रेटरी प्रमोद नेमाडे, ज्येष्ठ पर्यवेक्षक वाय.एन.झोपे, पर्यवेक्षक एस.एल.राणे व्यासपीठावर उपस्थित होते. मुख्याध्यापक एन.बी.किरंगे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. दहावीची विद्यार्थिनी भार्गवी नेहेते, इयत्ता बारावीची विद्यार्थिनी डिंपल महाजन यांनी मनोगत व्यक्त केले. दहावीची विद्यार्थीनी रूपाली पाटील हिने स्वरचित निरोप ही कविता सादर केली. शिक्षक प्रतिनिधी म्हणून एन.एस.पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. प्रमुख अतिथी जी.आर.चौधरी यांनी शिक्षण आणि संस्कार यांचे महत्त्व व्यक्त केले. पी.व्ही.पाटील यांनी आपले ध्येय गाठण्यासाठी विद्यार्थ्यांना परीश्रम करण्याचा सल्ला दिला. सूत्रसंचालन एस.पी.महाजन यांनी केले. विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. आभार ज्येष्ठ पर्यवेक्षक वाय.एन.झोपे यांनी मानले.








