जळगाव जिल्हा पोलिस दलाची नूतन अधीक्षक डॉ.रेड्डी यांनी स्वीकारले सूत्रे

अधिकारी व कर्मचार्‍यांमधील समन्वयामुळे 56 जणांवर एमपीडीए शक्य : एम.राजकुमार


New Superintendent of Jalgaon District Police Force Dr. Reddy accepted the formula जळगाव : जिल्हा हा कायदा व सुव्यस्थेसह राजकीयदृष्ट्यादेखील संवेदनशील जिल्हा आहे त्यामुळे सगळीकडून प्रेशर तर होते मात्र लोकप्रतिनिधींसह सर्वांनी समजून घेतले त्यामुळे कुठलाही निर्णय एकतर्फी घेतला नाही. 15 महिन्यांच्या कार्यकाळात महसूल आणि पोलीस दलातील अधिकारी व कर्मचार्‍यांमधील समन्वयामुळेच 56 जणांवर केलेल्या एमपीडीएचा आकडा गाठता आला. हे संपूर्ण श्रेय पोलीस दलातील सहकार्‍यांचे असल्याचे मत मावळते पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी व्यक्त केले.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांची सोलापूर शहर पोलीस आयुक्त म्हणून पदोन्नती झाल्याने त्यांचा निरोप समारंभ व जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांचा स्वागत समारंभाचे जिल्हा पोलीस दलाकडून करण्यात आले होते. व्यासपीठावर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मावळते पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, नूतन पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, चाळीसगाव विभागाच्या अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, एम.राजकुमार यांच्या पत्नी रमैय्या कन्नन उपस्थित होत्या.



जिल्ह्याने चांगल्या आठवणी दिल्या
पुढे बोलतांना एम. राजकुमार म्हणाले की, पंधरा महिन्यात या जिल्ह्याने चांगल्या आठवणी दिल्या आहेत. काम करतांना पोलीस दलातील सर्व अधिकार्‍यांमुळे कुठलच टेन्शन नव्हत. नेहमी आपल्या सहकार्‍यांच्या मागे उभे राहिले पाहिजे. एम. राजकुमार यांच्या कार्यकाळातील शेवटचा एमपीडीएच्या पंधरा दिवसांच्या प्रस्तावाचे कामकाज एका दिवसात पुर्ण करुन अबतक 56 चा आकडा गाठू शकलो असल्याचे ते यावेळी म्हणाले. त्यानंतर अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, कविता नेरकर, डीवायएसपी संदिप गाचीत, कृष्णात पिंगळे, कुणाल सोनवणे, अन्नपुर्णा सिंह, अभयसिंग देशमुख यांच्यासह अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डीवाएसपी संदीप गावीत यांनी तर आभार पोलिस उपनिरीक्षक रेश्मा अवतारे यांनी मानले.

56 एमपीडीए हे पोलीस दलाचे यश : जिल्हाधिकारी
पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी साम, दाम, दंड आणि भेदचा वापर करीत 56 सराईत गुन्हेगारांवर केलेल्या एमपीडीए कारवाई ही जिल्हा पोलीस दलाचे यश आहे. त्याचा परिणामदेखील समाजात चांगल्या पद्धतीने दिसून येत आहे. त्यामुळे गुन्हेगारीला देखील लगाम लागलेला आहे. घटनेच्या ठिकाणी सर्व काही झाल्यानंतर पोलीस येतात, याला जळगाव पोलीस दल अपवाद ठरले असून आतापर्यंत झालेल्या घटनेच्या ठिकाणी अवघ्या काही मिनिटातच पोलीस दाखल झाल्यामुळे पुढील अनर्थ टळले आहेत. पोलीस अधीक्षकांकडून शिकण्यासारखे भरपूर काही असून कार्यालयीन कामकाज करतांना इगो मुक्त प्रशासन आणि सेवा हे सर्वात महत्वाचा गुण मी त्यांच्याकडून शिकलो असल्याचे मत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी व्यक्त केले.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !