भुसावळ शहरात दोन रुग्णवाहिकेचे लोकार्पण
Inauguration of two ambulances in Bhusawal city भुसावळ : भुसावळ पालिकेच्या माध्यमातून दोन रुग्ण वाहिकांचे पालिका रुग्णालयात आमदार संजय सावकारे यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले. हॉस्पीटलमधील रुग्णांना जळगाव येथे उपचारासाठी न्यायचे असल्यास त्यांना या रुण वाहिकेचा लाभ मिळणार आहे. पालिका रुग्णालयात मंगळवारी पालिकेच्या माध्यमातून दोन रुग्णवाहिका पालिका रुग्णालयास देण्यात आल्या. या दोन्ही रुग्णवाहिकेचे लोकार्पण आमदार संजय सावकारे यांच्याहस्ते करण्यात आले.
रुग्णांची गैरसोय टळणार
यावेळी पालिकेचे मुख्याधिकारी महेश वाघमोडे, वैद्यकीय अधिकारी डॉ.किर्ती फलटणकर यांच्यासह माजी नगरसेवक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.. पालिका रुग्णालयाच्या आवारात गाड्या लावून त्यांचे पूजन करण्यात आले. आमदार यांनी नारळ वाढवून गाड्यांचे लोकार्पण केले. या दोन्ही गाड्यांमुळे रुणांना वेळेत जळगाव येथे पोचता येणार आहे. नवीन गाड्या असल्याने त्या गाड्यामध्ये ऑक्सिजनची सुध्दा सुविधा करण्यात आली आहे. यामुळे रुग्णांना ऑक्सिजन लागल्यास त्या रुग्णांना गाडीतच ऑक्सिजन मिळणार आहे. पालिकेच्या माध्यमातून दिलेल्या दोन्ही रुग्णवाहिका या रुग्णांना जीवनदान देण्यास नक्कीच उपयोगात येतील, असे पालिकेचे वाहन विभाग प्रमुख विवेक माकोडे यांनी सांगितले.








