रावेरातील एकोपा कायम ठेवण्यासाठी नागरीकांनी सहकार्य करावे
शांतता समितीच्या बैठकीत सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह
Citizens should cooperate to maintain harmony in Raver रावेर : एखाद्या घटनेची माहिती झाल्यास कायदा हातात घेऊन त्यावर प्रतिक्रिया देवू नका. त्या घटनेची माहिती तत्काळ पोलिसांना द्या, संयम ठेवून शहरातील शांतता कायम ठेवा. शहरात कायम एकोपा ठेवण्यासाठी नागरीकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांनी रावेरात केले. रावेर पोलीस स्टेशनच्या आवारात शांतता समितीची बैठक झाली. यावेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिषकुमार अडसूळ, फौजदार सचिन नवले, तुषार पाटील उपस्थित होते. यावेळी माजी नगराध्यक्ष पद्माकर महाजन, अशोक शिंदे, दिलीप कांबळे, महेमूद शेख यांनी विचार मांडले.
यांची होती उपस्थिती
बैठकीला डॉ.सुरेश पाटील, सुधाकर महाजन, राजन लासुरकर, सी.एस.पाटील, अरुण शिंदे, दिलीप पाटील, संतोष पाटील, अॅड.योगेश गजरे, भावलाल महाजन, नामदेव महाजन, नितीन पाटील, पंकज वाघ, सुधाकर नाईक, शैलेंद्र अग्रवाल, शरद राजपूत, महेंद्र गजरे, बाळू शिरतुरे, डी.डी.वाणी यांच्यासह शांतता समिती सदस्य, पोलीस पाटील उपस्थित होते. यशस्वीतेसाठी कॉन्स्टैबल पुरुषोत्तम पाटील यांनी परीश्रम घेतले.








