अजितदादांनी टोचले कार्यकर्त्यांचे कान : म्हणाले, सारखं सारखं मुख्यमंत्री करु नका


Ajit Dada pierced the ears of the workers : said, don’t make the Chief Minister like that सून राष्ट्रवादी काँग्रेसमधील कार्यकर्ते अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा व्यक्त करीत असताना दादांनी कार्यकर्त्यांना मात्र जरा कळ सोसा, सारखं सारखं मुख्यमंत्री करु नका, आधी संघटना बांधू ती मजबूत करु, असा सल्ला दिला.

नव्या जबाबदार्‍या स्विकारल्या म्हणूनच इथवर मजल
आता आपल्याला विकासावर लक्ष द्यायचं आहे, महिला धोरण आपण आणलं आहे. काळानुरुप काही बदल करायचे असतात. युवकांसाठी आपण 2012 मध्ये धोरण आणलं होतं. आपण लोकशाहीत काम करतो. बहुमताला आदर देऊन त्यांना संधी द्यावी लागते, आपल्या जिल्हा अध्यक्षांनी खालच्या पदाधिकार्‍यांकडून जास्त अपेक्षा ठेऊ नये. आपल्या पक्षात निवड करताना जातीपातीचा विचार केला नाही पाहिजे. आम्ही आमच्या उमेदीच्या काळात नव्या जबाबदार्‍या स्विकारल्या त्यामुळे आता इथेपर्यंत येऊन पोहोचलो, असंही अजितदादा यावेळी म्हणाले.











मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !