काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा राजीनामा ? भाजपा प्रवेशाच्या चर्चा ?


Resignation of Congress leader and former Chief Minister Ashok Chavan? Discussions of BJP entry? मुंबई : काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात असल्याने राज्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे. चव्हाण हे काँग्रेसमधून भाजपात प्रवेश करणार असल्याचीही जोरदार चर्चा आहे शिवाय चव्हाण यांचा मोबाईल नॉट रीचेबल असल्याने संशय अधिक गडद ठरू पाहत आहे.

आमदारकीचा राजीनामा दिल्याची चर्चा
अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली त्यानंतर त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याच्या चर्चा सुरू आहे. नांदेडमध्ये राजकीय भूकंप झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. शोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष सोडला तर काँग्रेसला मोठा धक्का बसेल. मोठ्या काँग्रेस नेत्याच्या पक्षप्रवेशाची तयारी भाजप करत असल्याच्या चर्चादेखील सुरू आहेत.











मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !