काँग्रेसमध्ये प्रामाणिक काम केले ; दोन दिवसात राजकीय निर्णय घेणार : अशोक चव्हाण


Worked honestly in Congress ; Will take a political decision in two days : Ashok Chavan मुंबई  : काँग्रेसमध्ये असताना पक्षाचे काम प्रामाणिकपणे केले आहे. मला कोण बद्दल तक्रार करायची नाही. मला कोणाबद्दल व्यक्तीगत काही बोलायचे नाही. या पुढची राजकीय दिशा व निर्णय दोन दिवसात घेईल, अशी प्रतिक्रीया अशोक चव्हाण यांनी दिली. काँग्रेस पक्षाचा आणि विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच अशोक चव्हाण यांनी माध्यमांसोबत संवाद साधला.



भाजपामध्ये जाण्याबाबत अद्याप निर्णय नाही
अशोक चव्हाण म्हणाले की, भाजपची कार्यप्रणाली मला अद्यापही माहिती नाही, भाजपमध्ये जाण्याचा निर्णय मी अजुनही घेतलेला नाही. प्रत्येक गोष्टीला काही कारण असलेच पाहिजे असं नाही. माझ्या जन्मापासून मी काँग्रेसचे काम केले आहे, मला वाटलं आता अन्य पर्याय पाहिले म्हणून मी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे, असंही अशोक चव्हाण म्हणाले. मला कोणत्याही पक्षांतराची जाहीर वाच्छता करायची नाही. मला कोणाचीही उणीदुनी काढायची नाही, मला वाटलं आता वेगळ्या पर्यायाचा विचार केला पाहिजे, असंही अशोक चव्हाण म्हणाले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !