केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा महाराष्ट्रातील दौरा रद्द !
Union Home Minister Amit Shah’s visit to Maharashtra canceled! जळगाव : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे गुरुवार, 15 रोजी महाराष्ट्राच्या दौर्यावर येत असल्याने मोठी तयारी करण्यात आली होती तर पोलिसांनी बंदोबस्ताचे काटेकोर नियोजन केले होते मात्र शाह यांचा दौरा तडकाफडकी रद्द करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
दौर्यापूर्वीच चव्हाणांच्या हाती ‘कमळ’
काँग्रेसला टाटा करीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपात प्रवेश करणार होते व अमित शाह यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा होणार असल्याची चर्चा रंगत असतानाच मंगळवारी चव्हाण यांनी मुंबई पक्ष प्रवेश केल्यानंतर आता चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वी अमित शाह यांच्या छत्रपती संभाजीनगरच्या दौर्यावेळी अशोक चव्हाण यांचा भाजपा प्रवेशाचा सोहळा होणार होता.


जळगावात तयारी मात्र अचानक दौरा रद्द
जळगावात होणार्या युवा संमेलनासाठी भाजपचे नेते तथा केंद्रीय मंत्री अमित शहा हे 15 रोजी हजेरी लावणार होते मात्र महाराष्ट्राचा दौरा रद्द झाल्याने जळगावातही दौराही रद्द करण्यात आला आहे. खाजगी कारणांमुळे हा दौरा रद्द झाला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. अमित शाह हे पहिल्यांदाच जळगाव जिल्ह्याच्या दौर्यावर येणार होते मात्र आता हा दौरा लांबणीवर पडला आहे.






