माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण अखेर भाजपावासी


Former Chief Minister Ashok Chavan is finally a BJP member मुंबई : काँग्रेसमधून बाहेर पडलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी अखेकर मंगळवारी अखेर भाजपात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत त्यांनी आपले सहकारी अमर राजूरकर यांच्यासह भाजपमध्ये प्रवेश केला. बशोक चव्हाण यांनी सोमवारी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.

प्रामाणिकपणे काम करण्याची ग्वाही
मी प्रामाणिकपणे भाजपमध्ये काम करेन. राज्यात भाजपला कशा अधिक जागा मिळतील यासाठी काम करू, काँग्रेस सोडण्याचा निर्णय सोपा नव्हता. यासाठी खूप विचार करावा लागला. काही गोष्टी देशासाठी आणि राज्यासाठी चांगल्या होत असतील तर निर्णय घ्यावा, असे वाटल्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले.



पक्षाविरोधात बोलणे योग्य नाही
अशोक चव्हाण पुढे बोलताना म्हणाले की, मी पक्षासाठी योगदान दिले. मी पार्टी वाढवण्यासाठी काम केले त्यामुळे टीका करणे योग्य नाही. सभागृहात विरोधी भूमिका मी प्रामाणिकपणे निभावली. सभागृहाच्या बाहेर मात्र एकमेकांशी संबंध होते ती एक परंपरा आहे. पक्ष जे आदेश देतील ते मला मान्य असतील. जे मला सांगितले जाईल त्यानुसार मी काम करेन. हा माझा व्यक्तिगत निर्णय होता मला कुणी जा, असे सांगितले नाही.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !