रावेरचे प्रसिद्ध उद्योगपती श्रीराम पाटील यांचा जय श्रीरामचा नारा : भाजपा प्रवेशाने बदलणार समीकरणे !
Jai Shriram’s slogan of Raver’s famous industrialist Shriram Patil : Equations will change with BJP’s entry! भुसावळ : रावेरचे प्रसिद्ध उद्योगपती व श्रीराम उद्योग समूहाचे चेअरमन श्रीराम पाटील यांनी बुधवार, 14 फेब्रुवारी रोजी निवड कार्यकर्त्यांसोबत भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याहस्ते तसेच ग्रामविकामंत्री गिरीश महाजन, जळगाव पूर्वचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांच्या विशेष उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. मराठा समाजाचा आश्वासक चेहरा असलेल्या उद्योजक श्रीराम पाटील यांच्या भाजपा पक्ष प्रवेशाने आगामी काळात रावेर लोकसभा व विधानसभा निवडणुकीत अनेक समीकरणे बदलणार आहेत शिवाय भाजपाची या भागात आणखी ताकद वाढणार आहे हेदेखील तितकेच खरे !
यांनी केला पक्ष प्रवेश
यावेळी श्रीराम पाटील यांच्यासह रावेर नगरपरीषदेचे माजी नगराध्यक्ष शीतल पाटील, दर्जी फाऊंडेशनचे संचालक प्रा.गोपाल दर्जी, माजी उपनगराध्यक्ष अब्दुल मुतलीफ, मुंजलवाडी सरपंच अशोक हिवराळे, बोरावलचे सरपंच सचिन मोरे, वडोदा सरपंच गोपाल चौधरी, विवरे वि.का. सोसायटी संचालक केतन राणे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र माणिक चौधरी, मायक्रोव्हीजन अकॅडमी स्कूलचे सेक्रेटरी स्वप्निल पाटील, मराठा सेवा संघ रावेरचे माजी तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील, पातोंडी वि.का.सोसायटीचे माजी संचालक विनोद पाटील, विवरे येथील प्रगतिशील शेतकरी विकास पाटील, निलेश पाटील, पातोंडी गावचे प्रगतीशील शेतकरी रामचंद्र पाटील, गोविंद पाटील, लक्ष्मण चौधरी, नशिराबादचे युवा कार्यकर्ते सुरज कोलते आदींनी पक्षप्रवेश घेतला.



यांची होती उपस्थिती
पक्ष प्रवेशावेळी जामनेर तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, माजी उपाध्यक्ष प्रल्हाद पाटील, तालुकाध्यक्ष महेश चौधरी, माजी तालुका अध्यक्ष सुनील पाटील, अॅड.प्रवीण पाचपुते यांची उपस्थिती होती.
पक्ष देईल तो आदेश मान्य करणारः उद्योजक श्रीराम पाटील
आज निवडक पदाधिकार्यांसोबत भाजपात पक्ष प्रवेश सोहळा झाला आहे. आगामी काळात मोठा कार्यक्रम घेण्यात येईल व या माध्यमातूनही प्रवेश सोहळा मोठ्या प्रमाणावर होईल. पक्ष देईल तो आदेश आपल्याला मान्य असणार आहे, अशी भावना उद्योजक श्रीराम पाटील यांनी ‘बे्रकींग महाराष्ट्र’ शी बोलताना व्यक्त केली.






