आमदार संजय सावकारे यांच्या प्रयत्नांना यश : कंडारीतील पुरातन कपिलेश्वर महादेव मंदिराला ‘ब’ वर्ग र्तीक्षेत्राचा दर्जा
दर्जा वाढीमुळे मिळणार विकासासाठी अधिक प्रमाणात निधी
Success to the efforts of MLA Sanjay Savkare : The ancient Kapileshwar Mahadev temple in Kandari has been granted ‘B’ category status. भुसावळ : कंडारी गावातील कपिलेश्वर महादेव मंदिराला क वर्ग तिर्थक्षेत्रात समाविष्ठ करण्यात आले होते. या मंदिराला कमी प्रमाणात निधी उपलब्ध होत असल्याने अनेक विकासकामांना ब्रेक लागला होता. दरम्यान यातीर्थक्षेत्राला राज्याच्या ग्रामविकास विभागाने ‘ब’ वर्ग दर्जा दिला आहे. यामुळे आता कपिलेश्वर मंदिराच्या विकासासाठी अधिक प्रमाणात निधी उपलब्ध होणार आहे.
आमदारांच्या प्रयत्नांना यश
आमदार संजय सावकारे यांच्या प्रयत्नांमुळे या मंदिराला राज्य शानाकडून तीर्थक्षेत्राचा ‘क’ दर्जा मिळाला मात्र ‘क’ दर्जा असल्याने मंदिरासाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळत नाही. यामुळे या मंदिराचा तिर्थक्षेत्र विकास योजनेतून दर्जा वाढवावा, अशी मागणी मंदिर प्रशासनाने केली होती. यानुसार आमदार सावकारे यांनी ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेतंर्गत ग्रामीण तीर्थक्षेत्रांना ब वर्ग देण्याकरीता प्रस्ताव 9 ऑक्टोंबर 2023 रोजी सादर केला होता. समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत कंडारीच्या कपिलेश्वर मंदिराला ‘ब’ वर्ग दर्जा देण्यात आला आहे. याबाबतचे निर्देश ग्रामविकास विभागाचे सहसचिव का. ओ. वळवी यांनी काढले आहेत. यामुळे आता आगामी काळात विकासात्मक कामांसाठी निधीचे प्रमाण वाढेल. यापूर्वीही कंडारीतील कपीलेश्वर मंदिरात प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतूनही विकास केला जाणार आहे.


कंडारी मोठे अध्यात्मिक केंद्र होणार
कंडारीतील ऐतिहासिक व पुरातन मंदिरांचा व्यापक प्रमाणात विकास करून ते तालुक्यातील मोठे अध्यात्मिक केंद्र म्हणून नावारुपास यावे, यासाठी प्रयत्न आहेत. यासोबतच पर्यटन विकासासाठी शासनाकडे निधी मिळविणार आहे. यासोबत तालुक्यातील विल्हाळे, हतनूर व साकेगाव येथेही नवीन पर्यटन केंद्र उभे राहतील, असे आमदार संजय सावकारे म्हणाले.






