उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का : बबनराव घोलप यांचा राजीनामा


Big blow to Uddhav Thackeray group: Babanrao Gholap’s resignation नाशिक : शिवसेनेचे उपनेते व 25 वर्ष आमदार राहिलेले बबनराव तथा नाना घोलप यांनी गुरुवारी राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून घोलप हे शिवसेनेला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा असताना ही चर्चा अखेर खरी ठरली आहे तर घोलप यांनी आता कुठल्या पक्षात प्रवेश करणार हे जाहीर केलेले नाही.

या कारणामुळे घोलप यांनी दिला राजीनामा
घोलप म्हणाले की, मला पक्षाने जे जे सांगितले, ते प्रामाणीकपणे केले मात्र अचानकपणे शिर्डी लोकसभा संपर्कप्रमुख पदावरुन वरुन मला काढुन मला अपमानीत करण्यात आले. आपण ज्यांना निष्क्रीय पदाधीकारी म्हणून काढुन टाकले होते व नवीन पदाधिकारी नेमले होते. त्यांना ही बदलण्यात आले, हे कितपत योग्य आहे ?



विशेष म्हणजे ज्या सहा विधानसभा संपर्क प्रमुखांनी लेखी कळवले होते, की हे जुने पदाधिकारी कसे बिनकामाचे विकाऊ आहेत. ते लक्षात येऊन सुध्दा त्यांना परत घेऊन पद दिली हे सर्व पाहुन मी अचंबित आहे.नेमक माझं काय चुकल ते समजल नाही. मी याबाबत दादही मागितली पण काहीच ऊत्तर मिळाल नाही. माझे वकीली करणारेही गप्प आहे. त्यापेक्षा आपण थांबून घेणे महत्वाचे वाटल्याने राजीनामा दिल्याचे ते म्हणाले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !