वरणगावात लग्नाच्या वरातीत वाद : 13 जखमी, 15 जणांविरुद्ध दंंगलीचा गुन्हा


भुसावळ : तालुक्यातील वरणगाव येथील सिध्देश्वर नगरात लग्नाच्या वरातीत किरकोळ वादावरुन दोन गटात वाद हाणामारीत परावर्तीत होवून 13 जण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी सोमवारी वरणगाव पोलिसात दोन्ही गटांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 15 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.

दोन्ही गटाविरूद्ध गुन्हे दाखल
सिध्देश्वरनगरातील रहिवाशी सुरेश मराठे यांच्या मुलाचे लग्न असल्याने वरातीत निलेश काळे, जितू काळे, मुकेश काळे, रोशन काळे, एकनाथ काळे, किशोर काळे, गणेश पाटील, गजानन काळे, आंनदा धनगर, सोनाली राजपूत (सर्व राहणार सिध्देश्वरनगर, वरणगाव) यांनी अंकुश माळी यास आम्ही सांगतो मात्र आमच्या मनाप्रमाणे वागत नाही असे म्हणून त्यास यांनी लाथाबुक्यांनी मारहान करीत शिवीगाळ केली. भांडण सोडवण्यासाठी गेलले तक्रारदार रामदास माळी (64), त्यांचा नातू आकाश माळी, सून पूजा माळी यांनी भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला असता निलेश काळे याने रामदास माळी यांच्या डोक्यात उलटी तलवार मारली व त्याचा भाऊ मुकेश काळे यांने छातीवर वीट मारून फेकली तसेच गजानन वंजारी याने माळी यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार केले तसेच तक्रारदारासह त्यांच्या नातेवाईकांना जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने आमच्यावर तलवार हल्ला करीत लोखंडी रॉड विटा अशा घातक हत्यारांनी मारहाण करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी आरोपींविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला.




दुसर्‍या गटातर्फे तक्रार
दुसर्‍या गटातर्फे गजेंद्र काळे यांनी फिर्याद दिली. रोशन पाटील हा घरासमोर उभा असतांना त्यास अंकुश माळी, लखन माळी, शांताराम माळी, पवन माळी, रामदास माळी हे भांडण करीत असतांना दिसले म्हणून त्यांचे भांडण सोडविण्यास गेला असता अंकुश माळी यांने त्याच्या हातातील रॉड डोक्यावर मारला तसेच अन्य आरोपींनी लाथाबुक्यांनी मारहाण करीत जमिनीवर पडून रोशन यास लोखंडी फावड्याने मारहाण केली. दरम्यान, दोन्ही गुन्ह्यातील दोघा आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली तर अन्य आरोपी पसार झाले आहेत . दोन्ही गटातील जखमींना वरणगाव ग्रामीण रुग्णालयातून पुढील उपचारासाठी जळगाव येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. तपास मुक्ताईनगरचे पोलिस उपविभागीय अधिकारी संदीप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप बोरसे, उपनिरीक्षक हर्षल भोये, फौजदार सुनील वाणी करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !