भुसावळातील नाहाटा महाविद्यालयात मराठी व्याकरण प्रज्ञाशोध परीक्षा


भुसावळ : शहरातील भुसावळ कला, विज्ञान आणि पु.ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील मराठी विभागातर्फे मराठी व्याकरण प्रज्ञाशोध परीक्षा शुक्रवार, 16 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली. बी.ए., एम.ए., एम.एस्सी., बी.एस्सी, बी.सी.ए., बी.कॉम., एम.कॉम या वर्गातील 239 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी सहभाग नोंदविला.

यांची यशस्वीतेसाठी परीश्रम
सहभागी विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मो.रा.वाळंबे यांचे ई-बुक देण्यात आले. मराठी व्याकरणातील शब्दांच्या जाती, प्रयोग, विभक्ती, वर्णविचार, समास, काळ, वचन, लिंग, शब्दशक्ती, म्हणी, वाक्प्रचार इत्यादी घटकांवर मराठी व्याकरणाची परीक्षा घेण्यात आली. परीक्षेचे स्वरूप हे वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असून 50 प्रश्न 100 गुणांसाठी विचारले गेले. परीक्षेत प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावणार्‍या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले. सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. या परीक्षेला महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.एस.व्ही.पाटील, उपप्राचार्य प्रा.बी.एच.बर्‍हाटे, उपप्राचार्य प्रा.ए.डी.गोस्वामी यांचे मार्गदर्शन लाभले. परीक्षेच्या यशस्वीतेसाठी मराठी विभाग प्रमुख प्रा.जे.एफ.पाटील, प्रा.के.के.अहिरे, डॉ.पुरुषोत्तम महाजन, डॉ.स्वाती महाजन, डॉ.दिनानाथ पाठक, प्रा.वंदना महाजन, प्रा.गौतम भालेराव, डॉ.राजाराम तायडे, डॉ.सचिन राजपूत, प्रा.सुनील अडकमोल, डॉ.प्रियंका महाजन, प्रा.हेमंत सावकारे यांचे अनमोल सहकार्य लाभले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !