रावेरात दोन दुचाकींची समोरासमोर धडक : एक ठार, दोघे जखमी
Two bikes collide head-on in Ravera: one killed, two injured रावेर : दोन भरधाव दुचाकी समोरा-समोर धडकून झालेल्या अपघातात एक जण ठार तर दोघे जखमी झाल्याची घटना 17 रोजी रात्री येथील रेल्वे स्थानकरस्त्यावर घडली. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली.
एक जागीच ठार
रावेर रेल्वे स्थानक परीसरातील शिव कॉलनीतून किरण चिंतामण तायडे (29) हा दुचाकी (एम.एच.19 ए.वाय.1653) ने रावेरकडे येत असतांना रावेरकडून हर्षद उर्फ दादू सुरेश कदम हा दुचाकी (क्रमांक एम.एच.19 डी.झेड. 6032) ने येत असताना दोघा दुचाकींची जोरदार धडक झाली. या अपघातात किरण तायडे हा गंभीर जखमी झाला तर दोघे जखमी झाले. गंभीर जखमी असलेल्या किरण तायडे यास येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथामिक उपचार करून पुढील उपचरार्थ बर्हाणपूर येथे नेले जात असताना त्याचा मृत्यू झाला. इतर दोघांवर येथील खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. अपघातप्रकरणी विशाल मुकुंदा तायडे यांनी रावेर पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून रावेर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली. तपास सहायक पोलीस निरीक्षक गणेश धुमाळ करीत आहेत.


