सातशे रुपयांची लाच भोवली : वीज कंपनीचा तंत्रज्ञ एसीबीच्या जाळ्यात
Bribe of seven hundred rupees : Electricity company technician in ACB’s net नाशिक : सातशे रुपयांची लाच घैताना येवला वीज कंपनीचा वीज तंत्रज्ञ अनिल भास्कर आव्हाड (42) यास नाशिक एसीबीने अटक केली आहे. या कारवाईने लाचखोरांच्या गोटात खळबळ उडाली.
असे आहे लाच प्रकरण
43 तक्रारदार यांच्या नातेवाईकांनी त्यांच्या घरी नवीन वीज मीटर बसविण्यासाठी म.रा.वि.वि. येवला कक्ष, येवला येथे ऑनलाइन अर्ज केला होता. या ऑनलाइन फॉर्म भरून मिळालेल्या पावतीवर सही करण्यासाठी, अर्जदार यांच्याघरी भेट देण्यासाठी व फॉर्ममध्ये माहिती भरून देण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांच्याकडे मंगळवार, 20 रोजी फेब्रुवारी सातशे रुपयांची लाच मागणी केल्यानंतर एसीबीकडे तक्रार नोंदवण्यात आली. आव्हाड यांनी लाच स्वीकारताच त्यांना अटक करण्यात आली.








