कल्याण रेल्वे स्थानकात स्फोटके सापडली : आरोपींचा कसून शोध


Explosives found at Kalyan railway station: Thorough search for accused कल्याण : दगड खाणीच्या खदानींमध्ये सुरूंग स्फोटासाठी तसेच विहिरी खोदण्यासाठी वापरण्यात येत असलेली स्फोटके (डिटोनेटर्स) कल्याण रेल्वे स्थानकावर बुधवारी सकाळी सापडल्यानंतर यंत्रणेत प्रचंड खळबळ उडाली आहे. ही स्फोटके रेल्वे स्थानकावर कुणी आणून टाकली व त्यांचा उद्देश नेमकाय काय? यासह संशयितांचा सीसीटीव्हीद्वारे पोलिसांकडून कसून शोध सुरू करण्यात आला आहे.

अधिकार्‍यांची धाव
कल्याण पश्चिम फलाट क्रमांक एकवर संशयितरील्या पडून असलेल्या खोक्यांमध्ये स्फोटक पदार्थ असल्याची माहिती सफाई कामगाराने कल्याण लोहमार्ग पोलिसांना दिल्यानंतर कल्याण लोहमार्ग विभागाचे उपायुक्त मनोज पाटील, कल्याण परीमंडळाचे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांनी तातडीने रेल्वे स्थानकात सहकार्‍यांसह येऊन खोक्यांची तपासणी करून ते दोन्ही खोके ताब्यात घेतले



संशयितांचा शोध : विविध तर्क-वितर्क
ही स्फोटके खरेदी करून एखादा व्यावसायीक कल्याण रेल्वे स्थानकात येऊन लोकलने प्रवास करण्याच्या विचारात असावा व त्याचवेळी पोलीस किंवा अन्य हालचालींमुळे त्याने स्फोटकांचे खोके तेथेच ठेऊन पळ काढला असावा, असाही तर्क पोलिसांकडून काढला जात आहे. सीसीटीव्हीद्वारे संशयितांचा शोध सुरू करण्यात आला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !