सात हजारांची लाच भोवली : निफाडच्या धन्वंतरी रुग्णालयातील दोघे लाचखोर डॉक्टर एसीबीच्या जाळ्यात
Bribe of 7000 : Two bribe-taking doctors of Dhanwantari Hospital of Niphad in ACB’s net नाशिक : शासकीय योजनेत ऑपरेशन केल्यानंतर लाचेपोटी सात हजार रुपये मागणार्या निफाड, जि.नाशिक येथील धन्वंतरी रुग्णालयात दोघा डॉक्टरांना नाशिक एसीबीने अटक केली आहे. या कारवाईने लाचखोर डॉक्टरांमध्ये प्रचंड भीती पसरली आहे. डॉ.महेश प्रल्हाद परदेशी (40) व डॉ.महेश रामविलास बुब (51) अशी अटकेतील लाचखोरांची नावे आहेत.
असे आहे लाच प्रकरण
44 वर्षीय तक्रारदार यांच्या आईचा हात फ्रॅक्चर झाला असल्याने त्यांना धन्वंतरी हॉस्पिटल पिंपळगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. े शासनाच्या महात्मा ज्योतीराव जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत ऑपरेशन करून दिल्याच्या मोबदल्यात आरोपी डॉ.परदेशी यांनी तक्रारदार यांच्याशी संभाषणा दरम्यान पंच साक्षीदार यांच्या समक्ष सात हजार रुपये लाच शुक्रवारी मागितली. डॉ.बूब यांनी लाचेबाबत प्रोत्साहन दिल्यानंतर सापळा रचण्यात आला. डॉ.परदेशी यांनी लाच स्वीकारताच त्यांना अटक करण्यात आली.


यांनी केला सापळा यशस्वी
नाशिक पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक एसीबीच्या पोलीस निरीक्षक मीरा आदमाने, पोलीस निरीक्षक गायत्री जाधव व हवालदार पंकज पळशीकर, प्रमोद चव्हाणके, चालक परशुराम जाधव आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.
