चाळीसगावचे आमदार पॉवरफुल्ल : आरटीओ कार्यालय स्थापनेला मंजुरी
एम.एच.52 चाळीसगावची नवी ओळख उपप्रादेशिक परिवहन कार्यालय ठरेल चाळीसगावच्या विकासात मैलाचा दगड..!
Chalisgaon MLA Powerful : Approval for establishment of RTO office चाळीसगाव : शहरात परीवहन विभागाचे उपप्रादेशिक परीवहन कार्यालय (ठढज) स्थापन करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. नुकताच त्याचा शासन निर्णय निर्गमित झाला आहे. स्वतंत्र उपप्रादेशिक परीवहन ही चाळीसगावची नवी ओळख होणार असून आपला वाहन पासिंग क्रमांक एम.एच.52 असा असेल.
पाठपुराव्याला आले यश
जळगाव जिल्ह्यातील एक मोठा तालुका असणार्या चाळीसगाव तालुक्यातील वाहनधारकांना आपल्या वाहन पासिंग व आरटीओ संदर्भातील कामांसाठी 120 किमी दूर जळगाव येथे ये जा करावी लागत होती. त्यात पूर्ण दिवस प्रवासात जात असल्याने वेळ व श्रम वाया जात होते. दुर्दैवाने या प्रवासात अनेकांचे अपघात देखील झाले होते. चाळीसगाव वासीयांच्या भावनांची व माझ्या पाठपुराव्याची दखल घेत राज्य शासनाने विशेष बाब म्हणून चाळीसगाव येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय स्थापन करण्यास मान्यता दिल्याबद्दल मी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन व परीवहन विभागाचे सर्व सन्मा. अधिकारी वर्ग यांचे मनापासून आभार मानतो,



ऐतिहासीक निर्णयाचे स्वागत : आमदार
चाळीसगाव वासीयांसाठी हा निर्णय ऐतिहासिक व आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारा आहे. चाळीसगाव च्या विकासात उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मैलाचा दगड ठरेल हा मला विश्वास आहे, असे आमदार मंगेश चव्हाण म्हणाले. चाळीसगावकरांनी आमदार म्हणून मला आपल्या सेवेची संधी दिली, त्यामुळेच चाळीसगावच्या हितासाठी अहोरात्र काम करता येत असल्याचे आमदार मंगेश रमेश चव्हाण यांनी कळवले आहे.





