आईच्या अस्थींच्या विसर्जनाऐवजी वटवृक्ष लावून दिला पर्यावरणाचा संदेश
भुसावळातील कांबळे परीवाराने निर्माण केला आदर्श
Instead of burying the mother’s bones, the message of environment was given by planting a banyan tree भुसावळ : संपूर्ण विश्व तापमान वाढीच्या व हवामान बदलाच्या संकटात सापडलेले असतानाच आगामी काळात येणार्या संकटातून मानवी समाजाचे जगणे सुसह्य होण्यासाठी वृक्ष लागवड करणे गरजेचे असल्याची जाण ठेवत पर्यावरण जागर प्रतिष्ठान व वन्यजीव संरक्षण संस्थेच्या संकल्पनेतून भुसावळ तालुक्यातील कंडारी येथील सर्प अभ्यासक, पर्यावरण व वन्यजीव अभ्यासक, व पत्रकार सतीश कांबळे यांनी आई ताराबाई भगवान कांबळे यांच्या निधनानंतर त्यांच्या अस्थीसह रक्षाचे तापी पात्रात विसर्जन न करता खड्डा खोदून मृत आईच्या स्मरणार्थ वटवृक्ष लावून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला शिवाय जल प्रदूषण थांबवण्याचा संदेशही दिला. या उपक्रमास पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे (महाराष्ट्र राज्य) कार्यवाह, शिक्षक नाना पाटील यांनी वृक्ष भेट देऊन मोलाचे सहकार्य केले.
पर्यावरण जागर प्रतिष्ठान व वन्यजीव संरक्षण संस्थेच्या संकल्पनेतून भुसावळ तालुक्यातील कंडारी येथील सर्प अभ्यासक, पर्यावरण व वन्यजीव अभ्यासक, व पत्रकार सतीश कांबळे यांनी आई ताराबाई भगवान कांबळे यांच्या निधनानंतर त्यांच्या अस्थीसह रक्षाचे तापी पात्रात विसर्जन न करता खड्डा खोदून मृत आईच्या स्मरणार्थ वटवृक्ष लावून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला शिवाय जल प्रदूषण थांबवण्याचा संदेशही दिला. या उपक्रमास पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे (महाराष्ट्र राज्य) कार्यवाह, शिक्षक नाना पाटील यांनी वृक्ष भेट देऊन मोलाचे सहकार्य केले.


