राजकारणामध्ये शिवरायांच्या विचारांचा वसा अंगीकारणे आवश्यक : धनंजय चौधरी


फैजपूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी तत्कालीन कालखंडात पुणे शहराचा विकास केला. शेतकर्‍यांना कसण्यासाठी करमुक्त जमिनी दिल्या. शिवरायांनी राजसत्ता आणि धर्मसत्ता वेगळ्या ठेवल्या म्हणून ते युगपुरुष झाले. त्यांच्या कार्यामुळे शिवाजी महाराज फक्त इतिहासाच्या पानावरच न राहता त्यांनी प्रत्येकाच्या मनावर राज्य केले. असा राजा आपल्या महाराष्ट्रामध्ये झाला म्हणून आपणास आपल्या राजाचा आदर्श घेणे काळाची गरज आहे. राजकारणामध्ये शिवरायांच्या विचारांचा वसा घेऊन पुढे चालणे आवश्यक असल्याचे मत युवा नेते धनंजय चौधरी यांनी येथे व्यक्त केले. धनाजी नाना महाविद्यालयाच्या
इतिहास विभागाकडून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रसंगी छत्रपती शिवरायांच्या जीवन पटावर विद्यार्थ्यांना लघूपट दाखविण्यात आला.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.बी.वाघुळदे यांनी केले. यावेळी उपप्राचार्य प्रा.व्ही.सी.बोरोले, प्रा.कल्पना पाटील, प्रा.राजश्री नेमाडे, प्रा.निखील वायकोळे, प्रा.शेरसिंग पाडवी, प्रा.विजय तायडे, प्रा.सतीष पाटील, प्रा.डॉ. राकेश तळेले, प्रा.विवेक महाजन तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी गौरव महाजन, चेतन चौधरी, महेश चौधरी व ऋषी पाटील या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. आभार प्रा.डॉ.मारोती जाधव यांनी मानले.











मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !