भुसावळसह नांदुर्‍यातील दुचाकींची चोरी : कुविख्यात संशयित रावेर पोलिसांच्या जाळ्यात

चोरीच्या पाच दुचाकी जप्त : रावेर पोलिसांची गोपनीय माहितीवरून कामगिरी


Theft of two-wheelers in Bhusawal and Nandura : Notorious suspect in Raver police net रावेर : रावेर पोलिसांनी कुविख्यात गुन्हेगाराला अटक केली असून त्याच्या ताब्यातून चोरीच्या पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. संशयिताविरोधात नाशिकसह अन्य भागात गंभीर गुन्हे दाखल आहेत तर संशयिताने भुसावळसह नांदुरा भागातून दुचाकींची चोरी केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी दिली. संशयिताच्या अटकेमुळे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
रावेरचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांना दुचाकी चोरट्याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिले होते. संशयित अजय वाघोरे (27, रा.भोर रेल्वे स्टेशन, रावेर) हा फॅशन प्रो.कंपनीची (एम.एच.19 बी.आर. 5269) याच्याकडील दुचाकी चोरीची असल्याची माहिती मिळाल्यानंतर संशयिताची सखोल चौकशी केली असता संशयिताने दुचाकी चोरीची असल्याची कबुली दिली तसेच पॅशन प्रो, होंडा शाईन, होंडा एच.एफ.डिलक्स, विना क्रमांकाची होंडा शाईन अशा एकूण पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या. संशयिताने या सर्व दुचाकी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाणे हद्द तसेच नांदुरा भागातून चोरल्याची माहिती सूत्रांनी दिली.



यांनी आवळल्या संशयिताच्या मुसक्या
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग, वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार ईश्वर चव्हाण, सुरेश मेढे, समाधान ठाकूर, सचिन घुगे, प्रमोद पाटील, विशाल पाटील, महेश मोगरे, अमोल जाधव, सुकेश तडवी, तथागत सपकाळे, विकार शेख आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !