कुविख्यात पाच गुन्हेगार हद्दपार : पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांचे आदेश
Deportation of five notorious criminals: Superintendent of Police Bachchan Singh orders अकोला : शहराच्या विविध भागातील अट्टल व सराईत पाच गुन्हेगारांना हद्दपार करण्याबाबत पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी आदेश काढल्यानंतर गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.
यांच्यावर झाली कारवाई
अकोला शहरातील रोहीत उर्फ सारंग गजानन (32, भारती प्लॉट जुने शहर), संतोष जगदीश यादव (29, पावसाळे ले-आउट कौलखेड), ऋषभ विलास रायबोले (20, आंबेडकर नगर, नवीन बस स्थानकामागे), तुषार उर्फ चिकू आनंद लोंढे (21, शंकर नगर, अकोटफैल) तसेच विशाल देवलाल सदांशिव (21, कपीलवस्तु नगर, शिवणी) या आरोपींविरोधात दाखल गुन्हयांचे स्वरूप पाहता त्यांना मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 56 (अ) (ब) अन्वये जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले.

