यावल न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीत 69 खटले निकाली
दिवाणी, फौजदारी व वित्तीय संस्थांचे 22.57 लाख रुपये वसुल
69 cases were settled in the National Lok Adalat in the Yaval Court यावल : यावल न्यायालयात रविवारी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. त्यात दिवाणी, फौजदारी, वित्तीय संस्थासह दाखल होण्यापूर्वीचे तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या थकबाकीदारांचे एकूण तीन हजार 130 प्रकरणे पॅनल समोर ठेवण्यात आली. यात 69 प्रकरण तडजोडीने निकाली काढण्यात आली तर यातून एकूण 22 लाख 57 हजार रुपये वसुल झाले.
सकाळपासूनच नागरीकांची गर्दी
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधीकरण, मुंबई तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांच्या आदेशान्वये व यावल येथील न्यायालयात रविवार, 3 मार्च रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यावल तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश एस.बी.वाळकेसह दिवाणी न्यायाधीश व्ही.एस.डामरे यांच्या मार्गदर्शनाखाली या लोकअदालतीचे कामकाज न्यायाधीश एस.बी.वाळके व पॅनल सदस्य अॅड.रीतेश पुंडलीक बारी यांच्या पॅनलसमोर चालले. यात दिवाणी व फौजदारी एकूएण 401 प्रकरण ठेववण्यात आली. त्यापैकी 48 प्रकरणांचा निपटारा करण्यात आला व यातून सात लाख 37 हजार 998 रुपये वसुल झाले तसेच बँकेची तसेच इतर वित्तीय संस्था सह बी.एस.एन.एल., विद्युत वितरण कंपनी आदींच्या दाखल पूर्व दोन हजार 729 प्रकरणे या राष्ट्रीय लोक अदालती समोर ठेवण्यात आले होते. त्यापैकी 21 प्रकरणांवर निपटारा करण्यात आला व यातून 15 लाख 19 हजार 321 रुपये वसुल झाले. या राष्ट्रीय लोकअदालती समोर सर्व एकूणण तीन हजार 130 प्रकरण ठेवण्यात आली. यातील एकूण 69 प्रकरणांचा निपटारा होत एकूण 22 लाख 57 हजार 319 रुपये वसुल झाले.


यांचे लोकअदालतीसाठी परिमश्र
याा लोक अदालतीकरीता न्यायालयाचे सहायक अधीक्षक अनिता श्रावगी, लघू लेखक ए.बी.लिपीक, सी.एम. झोपे, एस.आर.तडवी, कनिष्ठ लिपीक एच. जी.सुर्यवंशी, जी.एस.लाड, एन. डी. राजपुत, डी.ए.गावंडे, पी.डी.चव्हाण, एस.एस.झांबरे, आर.डी.गोराणे, दीपाली घनमोडे यांनी परिश्रम घेतले. वकील संघाचे अध्यक्ष अॅड.जी.एम.बारी, अॅड.ए.एम.कुळकर्णी, अॅड.नितीन चौधरी, अॅड.राजेश गडे, अॅड.एस.जी.कवडीवाले, अॅड.गौरव पाटील सह सर्व वकील संघाच्या वकील वर्गाने वादी, प्रति वादीकडून कामकाज पाहिले.
ग्रामपंचायत थकबाकी वसुलीस प्रतिसाद नाही
या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ग्रामपंचायतीची घरपट्टी व पाणी पट्टीच्या थकबाकीदारांचे एकूण एकहजार 007 प्रकरण ठेवण्यात आले होते मात्र, या पैकी एक ही थकबाकीदाराकडून वसुली किंवा तडजोडी करीता प्रतिसाद मिळाला नाही.