भुसावळातील नमो क्रिकेट चषकावर जि.प.प्राथमिक शिक्षक संघाची मोहोर


G.P.Primary Teachers Association’s crown at Namo Cricket Cup in Bhusawal भुसावळ  : नमो क्रिकेट चषकावर जि.प.प्राथमिक शिक्षक संघाने आपली मोहोर उमटवली. अंतिम सामना जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक क्रिकेट संघ, भुसावळ आणि फ्रेंड्स क्रिकेट क्लब, भुसावळ यांच्यात झाला. अंतिम सामन्यात फ्रेंड्स क्रिकेट क्लब यांनी चार ओव्हरमध्ये 21 धावांचे आव्हान प्राथमिक शिक्षक संघाला दिले व अतिशय चुरशीच्या झालेल्या या सामन्यात प्राथमिक शिक्षक संघाने 3.1 ओव्हरमध्ये दोन विकेट राखून पूर्ण केले. कर्णधार समाधान जाधव यांना रोख पाच हजार रुपयांचे पारितोषिक, एक ट्रॉफी आणि सहभागी सर्व खेळाडूंना सन्माचिन्ह भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांच्याहस्ते देण्यात आले.

आमदारांनी केले उद्घाटन
भारतीय जनता पार्टी शिक्षक आघाडी भुसावळ शहर नमो चषक अंतर्गत भुसावळ तालुक्यातील सर्व माध्यमाच्या आणि सर्व व्यवस्थापनाच्या शिक्षकांसाठी भव्य नमो क्रिकेट स्पर्धेचा आयोजन करण्यात आले. उद्घाटन आमदार संजय सावकारे यांच्याहस्ते मशाल पेटवून करण्यात आले अध्यक्षस्थानी खासदार रक्षा खडसे होत्या. भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांनी मनोगत व्यक्त करताना भुसावळ तालुक्यात शिक्षकांसाठी प्रथमच अशा प्रकारच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. समाधान जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.




यांचे स्पर्धा यशस्वीतेसाठी परिश्रम
क्रिकेट स्पर्धेसाठी युवराज लोणारी, परीक्षीत बर्‍हाटे, प्रमोद नेमाडे, किरण कोलते, मनोज बियाणी, राजेंद्र आवटे, गिरीश महाजन, सतीश सपकाळे आदी उपस्थित होते. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी क्रीडा प्रमुख तुषार चिंधळे, बी.एन.पाटील, सुनील वानखेडे, इरफान शेख, गणेश त्रिपाठी यांनी परिश्रम घेतले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !