इन्काउंटर फेम माजी अधिकारी प्रदीप शर्मा यांना जन्मठेप


Ex-officer Pradeep Sharma of Encounter fame sentenced to life imprisonment मुंबई  : गुन्हेगारांचे कर्दनकाळ म्हणून एकेकाळी ओळख असलेल्या मुंबई पोलीस दलातील माजी अधिकारी प्रदीप शर्मा यांना 2006 साली झालेल्या लखन भैय्या चकमक प्रकरणात मुंबई हायकोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावल्याने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने प्रदीप शर्मा यांची निर्दोष मुक्तता केली होती. मात्र मुंबई हायकोर्टाने कनिष्ठ न्यायालयाचा हा निर्णय रद्द करत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

आधी निलंबन नंतर निर्दोष मुक्तता
मुंबईत 11 नोव्हेंबर 2006 रोजी वर्सोव्याच्या नाना-नानी पार्कजवळ रात्री सव्वाआठ वाजताच्या सुमारास डी. एन. नगर आणि जुहू पोलिसांनी संयुक्तरित्या रामनारायण गुप्ता उर्फ लखन भैय्या यांना चकमकीत ठार मारले मात्र नंतर ही चकमक बनावट असल्याचं विशेष तपास पथकाने केलेल्या चौकशीत उघड झाले. या प्रकरणात मुंबई पोलीस दलातील तब्बल 13 अधिकार्‍यांना अटक करण्यात आली होती. यामध्ये प्रदीप शर्मा यांचाही समावेश होता.




वादग्रस्त ठरलेल्या शर्मा यांना 2008 साली निलंबितही करण्यात आलं. मात्र नंतर कनिष्ठ न्यायालयाने त्यांची चकमक प्रकरणात निर्दोष मुक्तता केली होती. या निर्णयाला मुंबई हायकोर्टात आव्हान देण्यात आल्यानंतर सुनावणी पार पडली आणि अखेर मंगळवारी कोर्टाने प्रदीप शर्मा यांना जन्मठेप सुनावली आहे.

एन्काऊंटर स्पेशलिस्ट अधिकार्‍याची वादग्रस्त कारकिर्द
महाराष्ट्र पोलीस दलात 1983 ला उपनिरीक्षक म्हणून भरती झालेल्या प्रदीप शर्मा यांनी 1990 च्या दशकात 123 एन्काऊंटर केले. त्यामुळे त्यांची ओळख एन्काऊंटर स्पेशलिस्ट अशी बनली होती.

– नेहमी वादग्रस्त राहिल्याने त्याची खातेनिहाय चौकशी होऊन 2008मध्ये त्याला निलंबित केले होते.

– लखन भैया बनावट एन्काऊंटर प्रकरणात 2010मध्ये त्याला अटक झाली. त्यानंतर तीन वर्षांनी सुटका झाली होती.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !