हावडा ते मुंबई सेंट्रल दरम्यान होळी विशेष ट्रेन धावणार !


Holi special train will run between Howrah and Mumbai Central! भुसावळ : सणासुदीच्या काळात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन हावडा ते मुंबई सेंट्रल दरम्यान होळी विशेष ट्रेन चालवण्यात येणार आहे. गाडी क्रमांक 08843 हावडा ते मुंबई सेंट्रल विशेष ट्रेन सोमवार,25 रोजी हावडा येथून पहाटे तीन वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी 5.30 वाजता मुंबई सेंट्रल येथे पोहोचणार आहे.

गाडी क्रमांक 08844 मुंबई सेंट्रल ते हावडा विशेष गाडी गुरुवार, 28 मार्च रोजी मुंबई सेंट्रल येथून 10.35 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी 20.05 वाजता हावडा येथे पोहचेल. या गाडीला खरगपूर, टाटानगर, चक्रधरपूर, राउरकेला, झारसूगुडा, बिलासपूर, रायपूर, दुर्ग, गोंदिया, नागपूर, बडनेरा, भुसावळ, अमळनेर, नंदुरबार, भेटस्थान, वापी आणि बोरीवली स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या गाडीला 20 शयनयान आणि गार्ड ब्रेक व्हॅनसह दोन सामान्य द्वितीय श्रेणी बोगी असतील.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !