भुसावळात दिव्यचक्षू व दिव्यांग 35 महिलांना भेटवस्तूंचे वाटप
Distribution of gifts to 35 visually impaired and differently abled women in Bhusawal भुसावळ : अंधकल्याण संघ संचलित भुसावळ शाखेतर्फे जागतिक महिला दिन व दिव्यांग दिनानिमित्त लिलाई मंगल कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 35 दिव्यचक्षू व दिव्यांग महिलांना संस्थेतर्फे भेटवस्तू, शुभेच्छा व अन्नदान करण्यात आले. लिलाई हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर महिलांची उपस्थिती होती. यावेळी स्नेहदिीप अंध निराधार महिला आश्रमाच्या चेअरमन आरती चौधरी यांनी प्रास्ताविकात सांगितले की, देण्यात आनंद असतो तो आम्हाला या भगिनींमुळे घेता येतो. या महिलांना सुध्दा भावना आहे, त्यांना सुध्दा महिला दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात सहभागी होता आल्याने त्यांच्या चेहर्यांवर समाधान व्यक्त होत आहे. आम्ही जी शक्य होईल ती मदत करण्यासाठी सदैव तत्पर असतो.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
अध्यक्ष संजय पाटील यांनी आपले विचार मांडले. त्यात त्यांनी विवीध योजनांचा लाभ आमच्या बंधूभगिनींना मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. यासाठी समाजातील संतोष नारखेडे व वंदना नारखेडे या दानशूर लोकांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिव्य चक्षू रत्ना सुरेश पाटील (जळगाव) होत्या. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी सांगितले की, समाजाच्या कामासाठी सह्दयता, चिकाटी, काम करण्याची जिद्द असावी लागते. अंधकल्याण समितीच्या कामात सक्रिय सहभाग देण्याची इच्छा प्रदर्शित केली. यावेळी चेतन पाटील, लायन्स क्लबचे अध्यक्ष राजेश पाटील, डॉ.नरेंद्र भोलाणे उपस्थित होते. सूत्रसंचलन स्वाती भोळे तर आभार डॉ.बाळू पाटील यांनी मानले.


