भुसावळात गुन्हे शाखेची मोठी कारवाई : गावठी पिस्टल, दोन जिवंत काडतूसांसह आरोपी जाळ्यात
सलग दुसर्या दिवशी कारवाईने खळबळ : जंक्शन ठरतेय शस्त्र तस्करीचे केंद्र
Big operation of crime branch in Bhusawal : Gavathi pistol, accused with two live cartridges in the net भुसावळ : भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी सोमवारी रात्रीच गावठी पिस्टल व काडतूसासह आरोपीला पकडल्यानंतर दुसर्याच दिवशी मंगळवारी सायंकाळी जळगाव गुन्हे शाखेने भुसावळातील शहरातील एका संशयिताला गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतूसासह पकडल्याने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. मनीष उर्फ मिठ्या रवींद्र ठाकूर (23, गंगाराम प्लॉट, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
भुसावळातील मनीष ठाकूर या संशयिताकडे गावठी पिस्टल असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर वरीष्ठ पोलीस निरीक्षक किसनराव नजन-पाटील यांनी कारवाईचे आदेश दिले. पोलीस उपनिरीक्षक गणेश चौभे, हवालदार महेश महाजन, प्रीतम पाटील, श्रीकृष्ण देशमुख, रणजीत जाधव, मोतीलाल आदींच्या पथकाने सापळा रचला संशयित गंगाराम प्लॉटजवळील सदानंद डेअरीजवळ मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारा येताच त्यास ताब्यात घेण्यात आले. अंग झडतीत त्याच्याकडील 30 हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा व एक हजार रुपये किंमतीचे दोन जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. नाईक श्रीकृष्णा देशमुख यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार रमण सुरळकर करीत आहेत.


