नंदगावात माय-लेकींचा विनयभंग करीत मारहाण : त्रिकूटविरोधात गुन्हा
In Nandgaon My Lekkis were molested and beaten up: Crime against the trio अमळनेर : किरकोळ वादातून महिलेसह तिच्या मुलीला काठीने मारहाण करीत त्यांचा विनयभंग करण्यात आल्याची घटना अमळनेर तालुक्यातील नंदगाव येथे 19 रोजी सकाळी व सायंकाळी घडली. याप्रकरणी बुधवार, 20 मार्च रोजी रात्री 10.30 वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
मारहाण करीत विनयभंग
अमळनेर तालुक्यातील नंदगाव येथे 31 वर्षीय महिला ही आपल्या मुली व कुटुंबासह वास्तव्याला आहे. मंगळवार, 19 मार्च रोजी सकाळी 9 वाजता महिला ही आपल्या मुलीसोबत असतांना गावातील कैलास शांताराम पाटील, उमेश कैलास पाटील आणि रजूबाई कैलास पाटील या तिघांनर कारण नसतांना माय-लेकीला मारहाण केली व दोघांना लज्जा उत्पन्न होईल , असे कृत्य करीत जीवे ठार मारण्याची धमकीदेखील दिली. हा प्रकार घडल्यानंतर महिलेने अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. बुधवारी रात्री साडेअकरा वाजता कैलास शांताराम पाटील, उमेश कैलास पाटील आणि रजूबाई कैलास पाटील (तिघे रा.नंदगाव, ता.अमळनेर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार सुनील पाटील करीत आहे.

