यावल ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारीपदी डॉ.पी.एल.पवार
यावल : ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारपदी डॉ.पी.एल.पवार यांनी पदभार स्वीकारला आहे. दोन दिवसांपूर्वी यावलच्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झालेले डॉ.प्रल्हाद लालसिंग पवार हे मूळ शहादा तालुक्यातील आडगाव येथील रहिवासी असून ते शहादा तालुक्यातीलच म्हसावद येथील ग्रामीण रुग्णालयात सर्वप्रथम वैद्यकीय अधिकारी म्हणून त्यांनी एक वर्षसेवाकार्य केले व त्यांची दुसरी नियुक्ती यावलच्या ग्रामीण रुग्णालयासाठी वैद्यकीय अधिकारी या पदावर करण्यात आली असून त्यांनी पदभार स्वीकारला आहे. यावलच्या ग्रामीण रुग्णालयात मागील दोन वर्षापासून कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी मिळत नसल्याने रूग्णांची आरोग्य सेवा कोळमडली होती. यावलच्या ग्रामीण रुग्णालयात कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी मिळत नसल्याकारणाने रुग्णांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय निर्माण झाली होती. आता यावलच्या ग्रामीण रुग्णालयास दोन सक्षम वैद्यकीय अधिकारी मिळाल्याने उपचारा अभावी रुग्णांची होणारी गैरसोय दूर होईल, अशी अपेक्षा नागरिकांमध्ये व्यक्त करण्यात येत आहे.
