सेवाग्राम एक्स्प्रेसमधून पडल्याने सुरक्षा रक्षकाचा मृत्यू : पाचोरा रेल्वे स्थानकावरील घटना
Security guard dies after falling from Sevagram Express : Incident at Pachora railway station सोयगाव : होळीसाठी घरी येत असताना सेवाग्राम एक्स्प्रेसमधून उतरताना पाय घसरून पडलयाने बहुलखेड्याच्या तरुणंचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना रविवारी दुपारी चार वाजेच्या दरम्यान पाचोरा रेल्वे स्थानकात घडली. या घटनेमुळे बहुलखेडा (ता.सोयगाव) परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. राहुल शेषमल जाधव (24, बहुलखेडा, ता.सोयगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. भुसावळ येथे राहुल हा तरुण सुरक्षा रक्षक या पदावर कार्यरत असल्याचे समजते.
बहुलखेड्यात हळहळ
रविवारी होळी सणासाठी राहुल हा तरुण घरी येण्यासाठी तो भुसावळ स्थानकावरन पाचोरा येथे येण्यासाठी सेवाग्राम एक्स्प्रेसमध्ये बसला. पाचोरा स्थानकावर रेल्वेतून उतरताना त्याचा तोल जाऊन पाय घसरला व धावत्या रेल्वेखाली आल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पाचोरा रेल्वे पोलिसात नोंद करण्यात आली. शवविच्छेदन करून रात्री उशिरा बहुलखेडा येथे शोकाकुल वातावरणात जवानावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तरुणाच्या पश्चात आई, वडील, बहिण व भाऊ असा परिवार आहे.

