रंगाचा बेरंग : रंगपंचमी खेळून अंघोळीसाठी गेलेला धरणगावचा तरुण तलावात बुडाला


Colorless: A young man who went for a bath after playing Rangpanchami drowned in the lake: an incident in Dharangaon Taluka धरणगाव : सोमवारी रंगपंचमीचा सर्वत्र उत्साह असलातरी तरी धरणगाव तालुक्यात मात्र दुर्दैवी घटना समोर आली आहे. रंगपंचमी खेळून अंघोळीसाठी गेलेल्या धरणगाव येथील एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे. जितेंद्र माळी (20, रा.लोहार गल्ली) असे मयत तरुणाचे नाव आहे.

धरणगाव शहरात शोककळा
सोमवारी सकाळी रंगपंचमी खेळल्यानंतर जितेंद्र हा आपल्या तीन ते चार मित्रांसोबत धरणगावजवळ असलेल्या जांभोरा गावालगत असलेल्या तलावावर मित्रांसह पोहण्यास गेला होता. परंतु थोड्याच वेळात जितेंद्र बुडायला लागला. मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना यश आले नाही. साधारण तीन ते चार तासाच्या प्रयत्नानंतर जितेंद्रचा मृतदेह तलावातून काढण्यात यश आले. दरम्यान, रंगपंचमीच्या दिवशीच तरुण मुलाचा बुडून मृत्यू झाल्यामुळे धरणगावात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली. मयत जितेंद्रच्या आई-वडिलांनी मोठा आक्रोश केल्याने अनेकांचे मन हळहळले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !