गोजोरा व कुर्हेतील इसमाचा वेगवेगळ्या घटनेत मृत्यू
भुसावळ : तालुक्यातील गोजोरा व कुर्हेपानाचे येथील दोघांचा वेगवेगळ्या घटनेत मृत्यू झाला. याबाबत भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पहिल्या घटनेत गोजोरा येथील ईच्छाराम रामदास सपकाळे (37) यास मुळव्याधीचा आजार असल्याने आजाराने अशक्तपणाने चक्कर येत असल्याने जळगाव येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दुसर्या घटनेत कुर्हेपानाचे येथील बारी वाड्यातील रहिवासी ज्ञानेश्वर सुकलाल बारी (28) या तरुणाने गावातील राममंदिराजवळील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. दोन्ही अकस्मात घटनांचा तपास पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अमोल पवार व हवालदार युनूस शेख करीत आहेत.
