जामनेर पोलिसांची मोठी कारवाई : दोन दिवसात लाखो रुपयांची गावठी दारू नष्ट
Big operation of Jamner police : Village liquor worth lakhs of rupees destroyed in two days जामनेर : जामनेर पोलिसांनी अवैध हातभट्टी चालवणार्या व्यवसायीकांवर धडक कारवाई मसुरू केली असून दोन दिवसात हातभट्टी तयार करण्यासाठी लागणारे कच्चे व पक्के मिळून सुमारे तीन लाखांचे छापा मारून नष्ट केले. जामनेर तालुक्यातील शहापूर या ठिकाणी 23 रोजी विनोद सुंदरलाल जोशी (वाकडी दुर्योधन), उदयभान भिल राहणार (शहापूर), रवींद्र रंगनाथ सुरवाडे (शहापूर) यांच्या अवैध हातभट्टी दारू व्यवसायावर छापा मारीत दोन हजार 100 लिटर गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे रसायन कच्चे पक्के मिळून एक लाख पाच हजारांचा मुद्देमाल नष्ट केला.
कारवाईने उडाली खळबळ
24 रोजी शेळगाव शेडगाव येथे अलकाबाई नाना कोळी (तळेगाव), अरुण सीताराम कुडी, ईश्वर सिताराम कोळी (तळेगाव), भागदरा गोकुळ, पिंटू जोगी, प्रकाश सुभाष शिंदे, गजानन गंगाराम कोळी, गोविंदा कृष्ण ब्राम्हदे यांच्या अवैध हातभट्टी तयार करण्याच्या अड्ड्यांवर पोलिसांनी छापा मारत दोन लाख 40 हजारांचे चार हजार 800 लिटरचे गावठी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन नष्ट केले.


यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर काळे, राकेश वराडे, रवींद्र बिर्हाडे, मुकूंद पाटील, राजू तायडे, चंद्रशेखर नाईक ज्ञानेश्वर देशमुख, पांडुरंग पाटील, तुषार पाटील, निलेश घुगे, सचिन पाटील, राजेश लहासे, अमोल वंजारी आदींनी केली.