चिंचोलीच्या युवकाचा नशिराबादजवळ अपघाती मृत्यू


Accidental death of Chincholi youth near Nashirabad यावल : यावल तालुक्यातील चिंचोली येथील रहिवासी तरुणाचा जळगाव-नशिराबाद रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास घडला. निलेश गणेश सावंदे (कुंभार, 32, चिंचोली) असे मयताचे नाव आहे. निलेश हा आपल्या आई वडिलांच्या सोबत चिंचोली येथे वास्तव्यास होता. वीटभट्टीवर काम करून तो आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करीत होता. काही दिवसांपासून तो आपल्या पत्नीसह आवार-धामणगाव फाट्याजवळ वीटभट्टी थापण्याचे काम करण्यासाठी गेला होता.

कुशल कारागीर हरपल्याने हळहळ
सोमवार, 25 रोजी निलेश आपल्या तीन मित्रांसह दोन मोटरसायकलने रात्री भुसावळकडून जळगावकडे येत असताना महामार्गावर अज्ञात वाहनाने निलेशच्या मोटरसायकलला धडक दिली. यात निलेश जागीच ठार झाला तर गाडीवर मागे बसलेला त्याचा एक मित्र जबर जखमी झाला. अपघाताची बातमी चिंचोली येथे रात्री धडकताच त्याच्या कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. निलेश हा एक कुंभार समाजात एक कुशल कारागीर होता.निलेशच्या पश्चात आई-वडील लहान भाऊ, पत्नी, एक मुलगी एक मुलगा असा छोटासा परीवार आहे.



 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !